Thursday, 16 July 2020

मानवी रक्ताभिसरण संस्था (Human Blood Circulatory System)

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

मानवी रक्ताभिसरण संस्था (Human Blood Circulatory System)



प्रस्तावना:


सर्व प्राणी व वनस्पती मध्ये अन्न, वायू व उत्सर्जित पदार्थ यांची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी विशिष्ट संस्था असतात. विशेषतः प्राण्यामध्ये या संस्था (System) जास्त विकसित असतात.


रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार 


रकताभिसरणाचा शोध सर्वप्रथम विलियम हार्वे यांनी लावला, म्हणून त्यांना (Circulator) म्हणून ओळखले जाते.

जगातील जवळपास सर्व प्राण्यामध्ये रक्ताभिसरण संस्था अस्तित्वात असते, त्यापैकी काही प्राण्यामध्ये विविधता दिसून येते. याच्यावरून प्राण्यामध्ये रक्ताभिसरणाचे मुख्य दोन प्रकार असतात.


1) खुली रक्ताभिसरण संस्था (Open Blood Circulatory System )


2) बंद रक्ताभिसरण संस्था (Closed Circulatory System)



खुली रक्ताभिसरण संस्था


आकृती 1.1 Page No. 11 पहा.

2) यांच्यात विशिष्ट अशा रक्तवाहिन्या नसतात ज्या शुद्ध व अशुद्ध रक्ताचे वहन करतात.

3) यांच्यात शुद्ध व अशुद्ध रक्त शरीरात मिसळते.

4) उदा. संघ मोलुस्का व संघ आर्थोपोडा उदा. झुरळ, गोगलगाय, विंचू इत्यादी.

बंद रक्ताभिसरण संस्था

1)आकृती 1.1 Page No. 11 पहा.



2) विशिष्ट रक्तवाहिन्या (Blood vessels) असतात.ज्या शुद्ध व अशुद्ध रक्ताचे वहन करतात.



 3) शुद्ध व अशुद्ध रक्त हे शरीरात एकत्र मिसळत नाही. (हदयात मिळू शकते)

4) उदा. सरपटणारे, उभयचर व पृष्ठवंशीय प्राणी.

उदा. माणूस, मासे, बेडूक, पक्षी इत्यादी


विलीयम हार्वे (William Harve) 


1) रक्ताभिसरणाचा शोध सर्वप्रथम यांनी लावला


2) यांना 'Circulator' तसेच 'Father of Angiology' म्हणून संबोधले जाते


3) त्यांनी रक्तवाहिन्यांचा अभ्यास सर्वप्रथम जिवंत सापावर केला.


4) त्यांचे गुरु, फॅब्रीसीयस यांनी लांब शिरांमधील (Veins) झडपांचा शोध लावला.



Single Circulation (एकेरी अभिसरण)


ज्या अभिसरणात रक्त हे फक्त एकदाच हदयात पोचवले जाते त्यास 'एकेरी अभिसरण असे म्हणतात, आणि त्या हदयात अशुध्द रक्त (Deoxygenated Blood) असते.


Note :


1) ऑक्टोपसस्क्वीड (Squid) हे जरी संघ मोलुस्कात येत असले तरी यांच्यात खुल्या प्रकारची रक्ताभिसरण संस्था नसते, तर बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते.


2) ज्या रक्ताभिसरण संस्थेत रक्त हे बंद अशा वाहिन्यामधून वाहिल्या जाते, जे रक्त संपुर्णपणे कुठल्याही वाहिनीतून बाहेर येत नाही त्याला बंद रक्ताभिसरण संस्था म्हणतात. (फक्त रक्तातील काही घटकच बाहेर येतात उदा. ऑक्सिजन)


3) खुल्या प्रकारच्या रक्ताभिसरण संस्थेत रक्त हे शरीरभर खुल्या अवस्थेत भ्रमण करते, म्हणून त्याला खुली रक्ताभिसरण संस्था म्हणतात. (सर्वच रक्त रक्तवाहीन्याच्या बाहेर येते) 


मानवी शरीरातील बंद रक्ताभिसरण संस्था 


मानवी शरीरात बंद रक्ताभिसरण संस्था (Closed circulatory system) असते, म्हणजेच  मानवामध्ये अशुद्ध व शुद्ध रक्तासाठी वेगवेगळ्या रक्त वाहिन्या असतात, म्हणजेच रक्त एकत्र मिसळत नाही,


मानवी रक्ताभिसरण संस्था मुख्यत: तीन घटक येतात.


A) रक्तवाहिन्या (Blood vessels)


B) रक्त (Blood)


C) हृदय (Heart)



A) रक्तवाहिन्या (Blood vessels) 


मुख्यतः मानवी शरीरात त्याच्या वहनानुसार तीन रक्तवाहिन्या असतात.


1) धमणी (Artery)

2) शिरा (Veins)

3) केशवाहिन्या (Capillaries)


 सर्वप्रथम आपण रक्तवाहिन्याची दिशा समजून घेऊ

संकल्पना (Concept (आकृती 12 Page No. 11 पहा.)


आपल्या हृदयातून एक सर्वात मोठी अशी रक्तवाहिनी निघते जी संपूर्ण शरीरभर शुद्ध रक्ताचा (Oxygenated Blood) चा पुरवठा करते तिला महाधमणी (Aorta) असे म्हणतात. 


या महाधमणी पासून शरीरातील प्रत्येक अवयवाला रक्त पुरवठा करण्यासाठी फांदया (Branches) तयार होतात. त्या फांद्याला धमण्या म्हणतात. 


धमणीची फांदी (Branch) तयार होऊन धमणिका (Artiriole) तयार होतात. धमणिका पुढे जाऊन खूप छोट्या छोट्या अशा पातळ भित्तिका (Thin wall) असलेल्या फादया तयार करतात. यालाच केशवाहिन्या (Capillaries) असे म्हणतात. 


आपण महाधमणी पासून ते केशवाहिन्या पर्यंत फांदया पडत गॅलेल्या पाहिल्या, पुढे कशवाहिन्या एकत्र येऊन नवीन रक्तवाहिनी तयार करतात. यालाच शिरिका (Venules) असे म्हणता येईल. 



शिरीका पुन्हा एकत्र येतात व शिरा तयार करतात आणि या शरीरात तयार झालेल्या सर्व शिरा त्यांच्यात असलेले अशुद्ध रक्त (Deoxygenated Blood) हृदयाकडे महाशीर (Vena cava) द्वारे पाठवतात.

म्हणजेच असे म्हणता येईल की महाधमणी (Aorta) पासून ते केशवाहिन्या (Capillaries) पर्यंत फांदया पडत जातात आणि केशवाहिन्या पासून ते महाशीर (Vena cava) पर्यंत फांदया एकत्र येत जातात.



1) धमणी/रोहिणी (Artery) :


1. 'ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून दूर शरीराकडे जातात त्यांना धमणी म्हणतात.'

2. धमण्या साधारण: ऑक्सिजनयुक्त (Oxygenated) रक्ताचा पुरवठा करतात.

3. परतु फुफ्फुस धमनी (Pulmonary Artery) ही अशुद्ध रक्ताचे वहन करते.

 

धमणीची प्रमुख वैशिष्ट्ये


1) धमण्या शरिरापेक्षा (Veins) खोलवर पसरलेल्या असतात. (Deeply situated in body)

2) धमण्यांना झडपा (Valve) नसतात.


3) साधारणतः रक्तदाब हा धमण्यामध्ये जास्त असतो. (Blood Pressure)
i.e. 100 mmHg


4) धमण्याच्या भित्तिका (Walls) स्थितीस्थापक (Elastic) व स्नायू युक्त (Muscular) असतात.

 

5) तसेच धमण्याची भित्तिका ही साधारणतः शिरापेक्षा जाड (Thick) असते कारण येथे रक्तदाब जास्त असतो.
म्हणूनच धमण्याची आतून पोकळी (Lumen) शिरापेक्षा छोटी असते.


2) शिरा (Vein)


जी रक्तवाहिनी शरीराच्या भागाकडून हृदयाकडे, वापरलेल्या अशुद्ध रक्ताचे (Deoxygenated Blood) वहन करते, त्याला शिरा असे म्हणतात. 

(अपवाद : फुप्फुस भीगा शिरा शिर (Pulmonary vein) ज्यामध्ये शुद्य रक्त असते.


शिरांची प्रमुख वैशिष्ट्ये


1)" शिरा या शरीराच्या तत्त्वे लगतच म्हणजेच धमण्यांपेक्षा वर असतात. (Superficialy situated)


2) शिरी या कमी दाब व गुरुत्वाच्या विरुद्ध दिशेने रक्ताचे वहन करतात म्हणून त्यांना झडपा (Valve) असतात.


3) शिरामध्ये रक्तदाब हा खूप कमी असतो. (10-20 mmHg)

4) शिरा या कमी स्थितीस्थापक (Elastic) असतात.

 

5) शिरांच्या भित्तिका पातळ (Thin) असतात. म्हणूनच आतून पोकळी जास्त असते.


3) केशवाहिनी (Capillary)


या अशाप्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत ज्याच्यातून रक्त हे पेशीशी संबंधात येते.
म्हणजेच धमणी व शिरा यांना जाणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणता येईल.

  

केशवाहिन्याची प्रमुख वैशिष्ट्ये

1) केशवाहिन्याची भित्तिका (Wall) खूपच पातळ असते. कारण की भित्तिका एका थराने (Layer) बनलेली असते.

(i.c. Endothelium layer) पेशीशी संबंधीत रक्त हे केवळ केशवाहिन्या मार्फतच येते.


2) रक्त आणि पेशी यांच्यातील वायूची, अन्नाची व उत्सर्जित पदार्थाची देवाणघेवाण ही केवळ केशवाहिन्यामार्फत घडते.

 

महत्वाचे मुद्दे


1) मानवी शरीरात जवळजवळ 97000km एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.


2) रक्तदाबानुसार रक्तवाहिन्या चा चढता क्रम = शिरा (Veins) < केशवाहिन्या < धमण्या (Arteries)

3) भित्तिकेच्या (Walls) जाडीनुसार (Thickness) चढता क्रम 

केशवाहिन्या (Capillaries) < शिरा (Veins) < धमण्या (Arteries)

4) रक्तवाहिन्या चा अभ्यास करणे म्हणजे Angiology होय. (Stydy of Blood Vessels)

5) झडपा (Vave) म्हणजे स्नायूयुक्त पापुर्दे ज्यामुळे रक्त वापस मार्गाने येत नाही.


B) रक्त (Blood) 


मानवी रक्त मुख्यत: दोन घटकांनी बनलेले असते.


अ) रक्तद्रव (Plasma)

ब) रक्तपेशी (Blood cells)


अ) रक्तद्रव (Plasma)


रक्तातील रंग नसलेला किंवा फिकट पिवळसर अल्कली माध्यम (Alkaline/Basic medium) असलेला द्रव म्हणजे रक्तद्रव होय.


प्रमुख वैशिष्ट्ये


1) एकूण रक्ताच्या 55 % भाग म्हणजे रक्तद्रव (Plasma) होय.

2) रक्तद्रव म्हणजे 90 % पाणी, 7% प्रथिने (Protien) आणि उर्वरित 3 % भाग म्हणजे असेंद्रिय घटक (Non organic substances) होय. 

3) रक्तद्रव्यात मुख्यत: 4 प्रकारचे प्रथिने आढळतात.

4) याव्यतिरिक्त रक्तद्रवात (Plasma) ग्लुकोज, अमिनो आम्ल, मेद आम्ल (Fatty acid), युरिआ व विविध प्रकारचे वायू असतात. 

5) शरीरातील जास्तीत जास्त (70%) कार्बनडायऑक्साइड हा रक्तद्रवामध्ये बायकार्बोनेटच्या (Bicarbonate) स्वरूपात वहन होते.

6) रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अल्कली गुणधर्म हा बायकार्बोनट (Bicarbonate) मुळे असतो,




प्रथिने कार्य
+ ग्लोब्युलीन (Globulin)  - प्रतिद्रवे (Antibody) तयार करणे./प्रतिकार क्षमता नियंत्रित करणे
+ अल्ब्युमीन (Albumin) - शरीरातील पाण्याचा समतोल राखणे (Osmotic Balance) 
 
+ प्रोथ्रॉम्बीन (Prothrombin) - रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.
फायब्रिनोजन (Fibrenogen) - रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात. 





ब) रक्तपेशी (Blood Cells/Corpuscles)


(आकृती 1.3 Page No. 11 पहा.)


1)

RBC-Red Blood Cell/Corpuscles (लाल रक्त पेशी/लोहित रक्त पेशी)

2)

WBC-White Blood Cell/Corpuscles (पांढऱ्या रक्त पेशी/सैनिक पेशी/श्वेत रक्त पेशी)

3)

Platelets (रक्तपट्टीका/रक्त बिंबीका) 

1) RBC-Red Blood Cell/Corpuscles (लाल रक्त पेशी/लोहित रक्त पेशी)


  • लाल रक्त पेशी या गोलाकार, द्विअंतर्वक्र (Circular, Biconcave) आणि केंद्रक नसलेल्या (Non-nucleated) पेशी आहेत यांना Erythrocytes असे म्हणतात.
  • RBC या आकाराने खूप लहान असतात म्हणजेच 7 मायक्रोमीटर व्यास, 2.5 मायक्रोमीटर जाडी असते.
  • Haemoglobin (हिमोग्लोबीन) नावाच्या घटकामुळे RBC ला लाल रंग प्राप्त होतो
  • सामान्यत: RBC चे स्त्री मध्ये प्रमाण कमी असते.

 

  1. i.e.स्त्री : 4.3 ते 5.2 मिलीयन/घन मिमी किंवा 43 ते 52 लाख/घनमिमी.
  2. पुरुषामध्ये 5.1 ते 5.8 मिलीयन/घन मिमी (51 to 58 lakh/mm' of blood)
  • साधारण: RBC 127 दिवस जगतात. (सरासरी 120 दिवस) आणि नंतर त्या प्लीहा (Spleen) मध्ये जाऊन मरतात. (i.e. Grave Yard of RBC)
  • गर्भामध्ये (Fetus) RBC या यकृतात (Liver) किंवा प्लीहा (Spleen) मध्ये तयार होतात.
  •  प्रौढ माणसात (Adult) RBC या अस्थि मज्जा (Bone marrow) तयार होतात.


अस्थीमज्जा (Bone Marrow) म्हणजे काय?


अस्थि मधील (Bones) पोकळ जागेत असलेल्या मुळपेशी (stem cells) म्हणजेच अस्थिमज्जा होय ज्याव्दारे विविध रक्तपेशी तयार केल्या जातात

  

हीमोग्लोबिन (Haemoglobin) 

RBC मधील महत्त्वाचा घटक 

एका RBC मध्ये लाखो हिमोग्लोबीन असतात.

हिमोग्लोबीनमध्ये हिम (Haeme) म्हणजे लोह (Iron) व ग्लोबीन म्हणजे प्रथिन होय.

ऑक्सीजनचे वहन हिमोग्लोबिन द्वारे केले जाते.

सामान्यतः पुरुषामध्ये 13-18gm/100ml व स्त्रीयामध्ये 11.5-16.5gm/100ml हिमोग्लोबीनचे प्रमाण असते.


हिमोग्लोबिन च्या कमतरतेमुळे अनेमिया नावाचा रोग होतो, तर हिमोग्लोबिन जास्त झाल्यामुळे पॉलीसायथेमीया नावाचा रोग होतो.

 

एक हिमोग्लोबीन जास्तीत जास्त ऑक्सिजनचे 4 रेणू वाहू शकतो.


रक्ताचा लाल रंग हिमोग्लोबिन मुळे असतो. ज्याप्रमाणे लोखंडावर गंज जडते व त्याचा रंग लाल होतो, तसेच रक्तातही होते. 

रक्ताचा लाल रंग हा लोह + ऑक्सिजन+ पाणी यामुळे असतो.


2) WBC (White Blood Corpuscles/Cell) (श्वेत रक्तकणिका) (पांढऱ्या पेशी)


आकाराने मोठ्या, अमिबासदृश, केंद्रक असलेल्या आणि रंगहीन पेशी आहेत.

या आकाराने RBC पेक्षा मोठ्या असतात. म्हणजेच 8 ते 15 मायक्रोमीटर व्यास असतो.

साधारणतः रक्तात 5000 ते 11000 प्रति घन मिमी WBC असतात. WBC ला Leucocytes असेही म्हणतात.

- WBC साधारण: 3-4 दिवस जगतात.

- मुख्यत: WBC चे 5 प्रकार पडतात.


WBC चे वर्गीकरण



श्वेत रक्त पेशी (WBC)



कोणिका पेशी (Granulocytes)

अकणिपेशी (Agranulocytes)

Neutrophils (62%)


Basophils (0.5%)


Eosinophils (3%)

Lymphocytes (33%)


Monocytes (3.9%)

 



a) Granulocytes (कणिका पेशी) : 

यांच्या पेशीद्रवात बारीक कणयुक्त पदार्थ असतात तसेच केंद्रक हे २ किंवा जास्त भाग (Lobes) असणारे असते.

b) Agranulocytes (अकणिका पेशी) : 

 

यांच्या पेशीद्रवात बारीक कणयुक्त पदार्थ नसतात.

 

WBC चा प्रकार

कार्य 


1) Neutrophils




सूक्ष्मजीवाला मारतात 




2) Acidophils/Eosinophil


अॅलर्जी मध्ये यांची संख्या वाढते (Antialergic) 

3) Basophils

हिपॅरीन व हिस्टामाइन यांचे वहन करणे व अँटीएलर्जिक

4) Lymphocytes


प्रतिकार क्षमतेत प्रतिद्रवे (Antibody) तयार करतात.

5) Monocytes

मृत सूक्ष्मजीवांना खातात (Scavanger)




Heparin (हिपॅरीन)

रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन, जे मास्ट पेशी तयार करतात.
 Histamine (हिस्टामाइन) सूज आल्यानंतर तिथे स्रावणारे (Secretion) रसायन, जे मास्ट पेशी तयार करतात. 


कुठल्याही प्रकारच्या रोगामध्ये प्रथम WBC ची संख्या वाढते आणि जेव्हा WBC ची संख्या 2 लाख प्रति घनमीमी पर्यंत वाढते त्याला रक्ताचा कर्करोग (Leukemia) म्हणतात.


WBC या अस्थिमज्जा (Bone marrow) तसेच प्लीहा (Spleen) मध्ये तयार होतात.


3) रक्तपट्टीका/रक्तबिंबिका (Platelets) 

यांचा आकार द्विबहीर्वक्र (Biconvex) असतो. तसेच रंगहीन असतात.

या रक्तपेशी फक्त सस्तन प्राण्यातच (Mamallian Animal ) आढळते.

यांना Thrombocytes असे पण म्हणतात, यांना केंद्रक नसते.

या अतिशय लहान (2.5 ते 5 मायक्रोमीटर व्यास) व तबकडी सारख्या असतात. 

रक्तपट्टीका 5 ते 10 दिवस जगू शकतात, या अस्थिमज्जा मध्येच तयार होतात.

- साधारणतः रक्तामध्ये 2.5 ते 4.5 लाख प्रति घन मिमी एवढ्या रक्तपट्टीका असतात.

रक्त गोठण्याच्या (Coagulation) प्रक्रियेत मदत करतात.

डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड या रोगात यांचे प्रमाण कमी होते.



लसिका संस्था (Lymphatic System)


1) 





सर्व पृष्ठवंशीय सजीवांत रक्ताभिसरण संस्थेव्यतिरिक्त, एक रंगहिन, प्रथिनयुक्त द्रव (लसिका) वहन करणारी संस्था अस्तित्वात असते तिला 'लसिका संस्था' असे म्हणतात,

2)

'चेतासंस्था' सोडुन इतर सर्व संस्थांमध्ये 'लसिका भिसरण' अस्तित्वात असते.

3) 

जसे मानवी शरिरात लसिका वहनासाठी विशिष्ट वाहिण्या व 'लिम्फ नोड्स' (Lymph Nodes) असतात तसेच 'मासे व उभयचर प्राण्यामध्ये लसिका वहनासाठी 'लसिका हृदय' असते. 


उदा. बेडुक प्राण्यामध्ये 4 लसिका हदय असतात (2-छातीच्या पोकळीत व 2-पोटाच्या पोकळीत)

4)  लसिका वहन करणाऱ्या / वाहनांच्या वाहण्यांमध्ये 'झडपा असतात.
5)  मानवी शरीराच्या डाव्या बाजूला लसिका वहन करणाऱ्या वाहिनीस 'थोरॅसिक डक्ट' (Thoracic Duct) असे म्हणतात. व उजव्या बाजूस उजवी लसिका वाहिनी असते (Right Lymphatic Duct)

6) 

सर्वात शेवटी सगळी लसिका ही सबक्लंवियन शिरेमध्ये (Subclvian vein) ओतले जाते.

7)

Lymph (लसिका):- यास रक्त वजा RBC किंवा रक्त अधिक WBC असे म्हणतात,

- रक्त द्रव्याप्रमाणेच लसिकांमध्ये 'Fibrinogen' असते जे लिसकाला गोठवते.

लसिका ही 'कार्बन डायऑक्साईड' व इतर 'चयापचय टाकाऊ पदार्थाचे वहन करतात.

आतड्यातून निघणाऱ्या लसिका वाहिनी मेद (Fast) शोषून घेतात व त्यांना दुधासारखे रूप प्राप्त होते.
(फिकट पांढरे) म्हणून त्याला Lacteals' असे म्हणतात.

8)  Lymph node हे शरीरात चाळणीसारखे काम करतात कारण त्यांच्या 'मॅक्रोफेजेस हे लसिकेतील जिवाणू.प्रतिजिवके व इतर टाकावू पदार्थ यांची गाळणी करून त्यांना वेगळं करतात.
9)   Lymph Nodes हे शरीरभर पसरलेले असतात पण ते जास्तकरून, मान, काखेत व जांघेत एकवटलेले असतात.

रक्ताचे प्रमुख गुणधर्म

1) 





शरीराच्या वजनाच्या 8 % भाग म्हणजे रक्त होय, परंतु संपूर्ण शरीराच्या ६०% भाग म्हणजे पाणी होय.
2)  रक्ताचा अभ्यास करणे म्हणजे Haematology होय.
3)  रक्त हे संयोजी ऊती (Connective tissue) चा प्रकार आहे.
4)  रक्ताचा साधारणत: pH हा 7.35 ते 7.45 म्हणजेच अल्कली असतो. (Basic)

5) 

साधारणत: मानवी शरीरात 5 liter रक्त असते.
6)  रक्ताचे विशिष्ट गुरुत्व (Specific gravity) हे 1.035 ते 1.075 एवढे असते.

7) 

 वायूचे परिवहन, पोषण तत्वाचे परिवहन, टाकाऊ पदार्थाचे परिवहन, शरीर संरक्षण, विकर व संप्रेरक परिवहन आणि तापनियमन ही रक्ताची प्रमुख कार्य होय.


C) मानवी हृदय (Human Heart) (आकृती 1.5 पहा) 


मानवी हृदयाला अनैच्छिक पंप (Involuntary pump) असे म्हणतात कारण, हृदय हे आपल्या इच्छेला अनुसरून चालत नसते.

मानवी हृदय हा एक स्नायूयुक्त अवयव आहे, ज्याच्यामध्ये स्वत: आकुंचन (Contraction) व प्रसरण (Relaxation) पावण्याची क्षमता असते. यालाच Myogenic हृदय म्हणतात.

मानवी हृदय दोन्ही फुप्फुसांच्यामध्ये, मध्यवक्षिय (Middle Thorasic) भागात वसलेले असते.

आकार साधारणपणे त्रिकोणाकृती, प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या डाव्या हाताच्या मुठीएवढा असतो.

वजन साधारणपणे 360 ग्रॅम असते.

 मानवी हृदय हे एकूण चार कप्प्याचे (Chamber) बनलेले असते. 

वरील आकाराने छोटे असलेले दोन अलिंदे (Atriun) व खाली असलेले दोन निलये (Ventricles) असतात.

शीतरक्ताच्या प्राण्यांचे (Cold blooded Animal) शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलते, या प्राण्यामध्ये ऑक्सिजनयुक्त व अल्पऑक्सिजनयुक्त रक्त एकमेकांत मिसळले जाते. अशा प्राण्याचे हृदय 3 कप्प्यांचे असते.

(दोन अलिंदे + एक निलये) 

उदा. उभयचर प्राणी (बेडूक), सरपटणारे प्राणी (साप).

माशांमध्ये (Fish) हृदय दोन कप्प्याचे असते. (एक अलिंद + एक निलय) त्यामुळे रक्त हृदयातून फक्त एकदाच जाते.


मानवी हृदयाचे कार्य


हृदयामध्ये एकूण चार कप्पे (Chambers) असतात. त्यापैकी प्रत्येकाचे कार्य वेगळे आहे आणि अशुद्ध व शुद््व रक्त एकत्र मिसळत नाही.


अलिंद = हृदयातील वरचे दोन कप्पे म्हणजे अलिंद होय. हृदयाचा जो क्रप्पा रक्त हृदयामध्ये स्विकारतो त्यास अलिंद = म्हणतात.

निलये = हृदयातील खालचे दोन कप्पे म्हणजे निलय होय. हृदयाचा जो कप्पा रक्त हृदयाच्या बाहेर घेऊन जाता त्यास निलये म्हणतात.


1) उजवे अलिंद किवा कर्णिक (Right Atrium Auricle)


(आकृती 1.4 आणि 1.5) 


उजव्या अलिंदामध्ये एकूण तीन रक्तवाहिन्या अशुद्ध रक्त घेऊन येतात.


i) अधोमहाशीर (Inferior venacava) 



हृदयाच्या खालच्या भागातील म्हणजेच डोके व हात सोडून शरीरातील सर्व अशुद्ध (deoxygenated) स्क्त या महाशीरेद्वारे एकत्र केले जाते व ते उजव्या अलिंदात सोडले जाते, ही महाशीर 'Eustachian' झडपांनी रक्षित केली जाते.

ii) उर्ध्व महाशीर (Superior vena cava) 



हृदयाच्या वरच्या भागातील म्हणजेच डोके व हाताचे अशुद्ध रक्त या महाशीरेद्वारे एकत्र केले जाते व उजव्या अलिंदात सोडले जाते.

ii) परिहृदयशिर (Coronary sinus) 

हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमणीला परिहृदय धमणी (Coronary Artery) म्हणतात आणि हृदयाचे अशुद्ध रक्त उजव्या अलिंदात sinus या छिद्राद्वारे सोडले जाते.


अशाप्रकारे उजव्या अलिंदात शरीरातील सर्व अशुद्ध रक्त एकत्रित केले जाते.


जेव्हा उजव्या अलिंदाचे स्नायू आकुंचन (Contraction) पावतात तेव्हा ते रक्त उजव्या निलयात (Right ventricles) सोडले जाते


परिहदयशिर ही "थिबॅशियन झडपा (Thebacian Valve) नी रक्षित केलेली असते


2) उजवे निलय (Right ventricle) किंवा जेवनिका


उजव्या अलिंदातील अशुद्ध रक्त उजव्या निलयात जाते. उजव्या निलयातले रक्त फुप्फुसभिगा धमणी (Pulmonary Artery) द्वारे हृदयाच्या बाहेर म्हणजेच रक्त शुद्धीकरणासाठी (Oxygenation) फुप्फुसाकडे पाठवले जाते.

उजव्या निलयातील रक्त फुप्फुस धमणी (Pulmonary artery) मध्ये ढकलण्यासाठी निलये आकुंचन (Contraction) पावतात . म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की हृदयाच्या उजव्या भागात अशुद्ध रक्त असते.

 


3) डावे अलिंद (Left Atrium/Auricle) डावे कर्णिक


जे रक्त फुप्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पाठवले होते ते पुन्हा हृदयात डाव्या अलिंदाद्वारे येते. म्हणजेच डाव्या अलिंदात दोन फुप्फुसाकडून (Lungs) फुप्फुसशिराद्वारे (Pulmonary vein) शुद्ध (Oxygenated) रक्त येते. 


डाव्या अलिंदात एकूण 4 फुफ्फुस शिरा (Pulmonary veins) येतात.

 डावे अलिंद आकुंचन पावून (Contraction) यातील शुद्ध रक्त डाव्या निलयात आणले जाते. 

4) डावे निलय (Left Ventricle) किंवा जेवनिका 


हा कंप्पा हृदयातील मोठा कप्पा व जाड भित्तिका असलेला कप्पा (Chamber) होय, कारण या कप्प्यात संपूर्ण शरीराला रक्त पोहचविण्याची क्षमता असते.


डाव्या अलिंदातून आलेले शुद्ध रक्त डावे निलय (Ventricle) संपूर्ण शरीराला पोहचविते.

 महाधमणी (Aorta) ही रक्तवाहिनी डाव्या निलयातून बाहेर निघते व हिच्या फांदया म्हणजेच धमण्या शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात.


Interesting Facts


1) मानवामधे जन्मापूर्वी गर्भाशयात दोन्ही अलिंदा दरम्यान एक छोटेसे छिंद्र असते त्यास 'फोरॅमेन ओव्हेल (foramen ovale) असे म्हणतात. त्याव्दारे जन्मापूर्वी दोन्ही अलिंदामध्ये रक्तप्रवाह होत असतो. अगदी जन्माच्या वेळी ते छीद्र आपोआप बंद होते व प्रोढांमध्ये त्याची खूण' म्हणून एक छोटा खड्डा शिल्लक राहतो त्याला 'फोसा ओव्हॅलीस' असे म्हणतात

2) जर 'फोरॅमेन ओव्हेल' जन्मानंतर काही आठवडे बंद नाही झाले तर त्यांना आपण हदयात छीद्र आहे' असे म्हणतात.

3) हृदय' हा गर्भाशयातील भ्रुणात तयार होणारा पहिला अवयव आहे 

 

Important Points


दोन्हीही अलिंदे एकदाच आकुंचन (Contraction) पावतात तर दोन्हीही निलये एकदाच प्रसरण (Relaxation) पावतात.

म्हणजेच असे म्हणता येईल हृदयाच्या उजव्या भागात अशुद्ध रक्त असते तर डाव्या भागात शुद्ध रक्त असते


 

शरीराकडून निघालेले अशुद्ध रक्त हृदयातून शुद्ध होण्यासाठी दोन वेळेस जाते, म्हणजेच उजव्या भागात एकदा पुन्हा ते फुप्फुसाकडे जाते व पुन्हा डाव्या भागात येते. यालाच दुहेरी अभिसरण (Double circulation) म्हणतात,

झुरळाचे हृदय हे 13 कप्प्यांचे असते.


 मानवी हृदय स्वतःचे आवेग (Impulse) स्वतः तयार करतात. म्हणून त्याला मायोजेनीक (Myogenic) हृदय म्हणतात.


 हे आवेग उजव्या अलिंदात वसलेल्या SA Node द्वारे तयार केले जातात, तेथून ते दोन अलिंदाच्या संपर्कस्थानी वसलेल्या AV Node कडे पाठवले जातात. 


AV Node आवेगाचे वहन निलयाकडे करते. या अवेगाचे वहन करण्यासाठी निलयामध्ये बंडल ऑफ हिज् हे स्नायूमय फायबर असतात. बंडल ऑफ हिज् च्या उंचवट्याला Purkinje Fibre म्हणतात. 

 हृदयातील प्रत्येक मोठ्या वाहिनी मध्ये रक्त परत जाऊ नये म्हणून स्नायूयुक्त झडपा (Valve) असतात. जसे उजव्या भागात त्रिदली झडपा (Tricuspid valve) तर डाव्या भागात द्विदली झडपा/मीट्रल झडपा (Bicuspid valve)असतात. 

हृदयाची लयबध्दता (Rhythmicity)


1) 

S.A. Node मुळे हदयाची लयबध्दता सांभाळली जाते, म्हणून S.A. Node ला पेसमेकर म्हटले जाते.

2) 

जर या नैसर्गिक पेसमेकरला काही कारणास्तव व्यवस्थित कार्य करता येत नसेल तर त्याच्या जागी कृत्रिम पेसमेकर बसवण्याची पध्दत विकसित करण्यात आली आहे.
3)

हे कृत्रिम पेसमेकर मुख्यत: Ni-cd (निकेल व कॅडमियम) च्या बॅटरीवर चालते.

4)

या यत्राचे आयुष्यमान ३ ते ७ वर्षापर्यंत असु शकते हे यंत्र हदयाला लयबध्द लहरी पुरविते व याचा हृददाच्या लयबध्दतेसंबधित रोगांमध्ये फार उपयोग होतो

 


● रक्तदाब (Blood Pressure) 


रक्तवाहिन्यांच्या भित्तिकेवर रक्तानी प्रयुक्त केलेल्या दाबाला रक्तदाब (Blood Pressure) म्हणतात.

 

साधारण: रक्तदाब हा धमण्याच्या भित्तिकेवर मोजला जातो.

 

निलयाच्या आकुंचनावेळी (Ventricular contraction) धमण्याच्या भित्तिकेवरील दाब म्हणजे वरचा रक्तदाब (Systolic B.P) होय, तर निलयाच्या शिथिलीकरणावेळी (Ventricular Relaxation) धमण्याच्या भित्तिकेवर असणारा दाब म्हणजे खालचा रक्तदाब होय. (Diastolic B.P.)

 

साधारण: रक्तदाब 120/80 mmHg असा लिहितात. यात 120mmHg म्हणजे वरचा रक्तदाब (Systolic B.P.) तर 80 mmHg म्हणजे खालचा रक्तदाब (Diastolic B.P.) होय.

 

रक्तदाब हा स्फीग्मोमॅनोमीटर या उपकरणाने मोजतात.

 

उच्च रक्तदाबाला हायपरटेंशन म्हणतात. (140/100 mmHg च्या वर) आणि कमी रक्तदाबाला हायपोटेंशन म्हणतात. (100/60 mm Hg च्या खाली)

 

हृदयाचे ठोके (Heart Beat) 



लयबद्ध अशा आकुंचन व प्रसरण पावण्याच्या व त्यातून बाहेर आलेल्या आवाजाला हृदयाचे ठोके असे म्हणतात

 

साधारण: 1 मिनिटाला 72 ठोके पडतात म्हणजेच प्रतिठोका हा 0.8 सेंकदात होतो.

 

हृदयाच्या ठोक्याचा आवाज हा लबडब (Lub-dub) असा असतो, जो की झडपांच्या उघड बंद होण्यामुळे असतो.

 

स्टेथोस्कोप (Stethoscope) या उपकरणाने हृदयाचे ठोके ऐकता येतात.

 

साधारण: ठोके जाणण्यासाठी (To feel the Pulse) मनगटाजवळील रॅडियल धमणी (Radial artery) चा वापर करतात.

 


हदयाच्या ठोक्यात होणारे बदल


1) 

जेवताना, अतिउत्साह, व्यायाम, ताप, गर्भधारणा इत्यादी परिस्थितीत हृदयाचे ठोके वाढतात.

2) 

झोपेत असताना व शॉक मध्ये हदयाचे ठोके कमी होतात

3) 

पुरुषांमध्ये हदयाचे ठोके स्त्रियांपेक्षा जास्त असतात.

4) 

जसे जसे उंचीवर जाईल तस तसे हृदयाचे ठोके वाढतात.

5) 

जेवढा सजिवाच्या शरीराचा आकार जास्त तेवढे हदयाचे ठोके कमी व याउलट (उदा. उंदीराचे हृदयाचे ठोके हे हत्तीपेक्षा जास्त असतात.



Important Points


1) हृदयाच्या पंपाची क्षमता ही 0.2 HP एवढी असते.
2)  हृदयातून जवळपास 1 मिनिटाला 5 लिटर म्हणजेच तासाला 340 लिटर व एका वर्षात 15 लाख लिटर रक्त पंप केले जाते.
 
3)  साधारणतः माणूस झोपेत असताना ठोके कमी असतात तसेच RBC चे प्रमाणही कमी असते.
 
4)  लहान बाळाचे हृदयाचे ठोके हे प्रौढ माणसापेक्षा जास्त असतात, परंतु रक्तदाब लहान बाळाचा कमी असतो.  

5)

 

ठोक्याच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी ECG-Electrocardio graph चा वापर केला जातो

याचा शोध Einthoven या शास्त्रज्ञानी 1903 मध्ये लावला. 

6)  पहिले हृदय प्रत्यारोप 1967 साली Cristian Bernard यांनी केले व भारतात Venugopal यांनी प्रयत्न केले.
 
7)   हृदयाचे ठोके वाढणे म्हणजे Tachycardia होय तर कमी होणे म्हणजे Bradycardia होय.
8)  Blue whale (देवमासा) या प्राण्याचे हृदय हे सर्वात मोठे असते.
 
9)   जिराफ या प्राण्याचे हृदय जमिनीवरील सर्व प्राण्यापेक्षा मोठे असते.
10)   लहान बाळामध्ये हृदयाचे ठोके 150/minute पर्यंत असतात.
11)

थैलेंसेमीया हा अनुवंशिक, बरा न होणारा, रोग आहे. ज्यामध्ये RBC कमी तयार होतात.

या रोगात हृदयाचा वाढतो. याचे प्रमाण गुजराती, पंजाबी, सिंधी लोकांत जास्त आहे.

12)  

RBC ला केंद्रक हे फक्त सस्तन प्राण्यामध्ये नसते.
परंतु उंट हा सस्तन प्राणी असून RBC ला केंद्रक असते.

उभयचर व सरपटणाऱ्या प्राण्यात RBC ला केंद्रक असते.

13)  

कॅल्शियम, व्हिटॅमीन K. आणि C. रक्तपट्टीका, फायब्रीनोजीन, प्रोथ्रोम्बीन हे सर्व रक्त गोठण्याच्या क्रियेत भाग

घेतात.

14)  रक्त गोठण्यासाठी मानवी शरीरात एकूण 13 घटक (13 factors) असतात.
15)  मानवी हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेला Cardiovascular system (SYS) म्हणतात.
16)  साधारणतः: RBC:WBC हे गुणोत्तर 600:1 एवढे असते.
17)  ठोक्याच्या आवाजाची तिव्रता 15db एवढी असते.
18)  जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue baby असे म्हणतात
19)

 झुरुळाचे हदय हे १३ कप्प्यांनी बनलेले असते

 

  • प्रत्येक कप्प्याची मांडणी अशा प्रकारे असते की त्याचा रक्तप्रवाह पाठीमागुन समोरच्या दिशेला होतो.

  • झुरळामधील रक्तास 'हिमोलिम्फ' असे म्हणतात कारण ते रंगहीन असते.

  • झुरळाच्या रक्तात जवळपास ३०,००० प्रति घनमिमि रक्तपेशी (Haemocytes) असतात.

  • भारतात प्रामुख्याने झुरळाच्या दोन प्रजाती आढळतात.

 

  1. पेरिप्लॅनॅटा (जास्त प्रमाणात)
  2. ब्लॅटा (कमी प्रमाणात)

 

  • झुरळा मध्ये 'हिमोग्लोबीन' आढळत नाही


No comments:

Post a Comment

If you have any doubt, let me know.