महाराष्ट्राचे स्थान
![]() |
महाराष्ट्र |
स्वातंत्रोत्तर काळात १९५६ मध्ये देशात भाषावर प्रांत रचनेनुसार पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार भाषिक तत्वावर आधारीत पहिले राज्य अस्तित्वात आले. याच पुनर्रचनेने हैद्राबाद राज्य मराठी भाषिक पाच जिल्हे (औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड) मध्य प्रातातील विदर्भाचे मराठी भाषिक आठ जिल्हे (बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ,
बॉम्बे प्रेसिडेसीमधील १३ जिल्हे असे २६ जिल्हे आणि गुजरात मिळून नोव्हेंबर १९५६ रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. परंतू मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी असल्यामुळे तत्कालीन महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंड गुजरात राज्यामध्ये आंदोलने झाली. सरतेशेवटी राज्यातील १०6 हुतात्मा च्या बलिदानानंतर मराठी भाषिकांकरीता गुजरात वगळता २६ जिल्हे असणारे महाराष्ट्र स्वतंत्र राज्य १९६० रोजी अस्तित्वात आले.
उत्तर व पूर्व गोलाधात भारत हे एक राष्ट्र असून उत्तरपूर्व गोलाधत असणानया आशिया खंडातील एक प्रमुख देश आहे. आशियातील भारताने व्यापलेल्या हिमालयापासून ते हिंदी महासागर पर्यंतच्या भागास भारतीय उपखंड असे म्हणतात. भारतीय जाग्यात भारताबरोबरच पाकिस्तान भूतान, नेपाल बास्लादेश व श्रीलंका यांचा समावेश होतो. भारताच्या या विशाल भूमीची प्रशासकीय व राजकीय विमागणी २२ राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेशात झालेली आहे.
भारतात असणाऱ्या २९ राज्यांपैकी एक प्रमुख राज्य म्हणजे महाराष्ट्र होय. महाराष्ट्र है भौगोलिक दृष्ट्या भारताच्या साधरणतः पश्चिम मध्यवर्ती भागात असून उत्तर भारत व दक्षिण भारत यांना जोडणारी विशाल भूमी म्हणून महाराष्ट्रा उल्लेख करता दईल.
महाराष्ट्र हे भौगालिकदृष्टया प्राचीन गोडवानाचा भाग असून या राज्यास फार मोठी ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक परपना आहे.
महाराष्ट्र हे आजही भारतातील एक महत्त्वाचे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे.
आजचा महाराष्ट्र हा १९६० पूर्वी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विखुरलेला होता, तो राजकिय दृष्ट्या खर्या अर्थाने 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आला.
स्थान:- महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिमेस असलेले घटकराज्य आहे.
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे राज्य होय.
महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार - १५°३७ उत्तर अक्षांश ते २२°६' उत्तर अक्षांश
महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार - ७२°३६ पूर्व रेखांश ते ८०°५४ पूर्व रेखांश इतका आहे.
विस्तार :- महाराष्ट्राची पश्चिंम-पूर्व लांबी जास्तीत जास्त ८००* कि.मी. दक्षिणोत्तर लांबी जास्तीत जास्त ७०० कि.मी. आहे.
असे स्पष्टीकरण देता येईल, की महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार हा दक्षिण-उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे.
क्षेत्रफळ :- राज्याचे एकूण क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाबाबत देशात राजस्थान (३,४२,२३९ ) चौ. कि. मी. व मध्य प्रदेश (३,०८,३१३ चौ.कि.मी.) यानंतर ३ रा क्रमांक लागतो.
भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९.३६ टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे. क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्रफळ असणाऱ्या राज्यांत गोवा प्रथम क्रमांकावर आहे.
राजकीय सीमा :-
x
महाराष्ट्राला एकूण ६ घटकराज्ये व १ केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागून आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात, उत्तरेस मध्य प्रदेश, ईशान्येस व पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक-गोवा या राज्यांचा सीमा लागून आहे.
महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे, तसेच सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे.
- महाराष्ट्राची सर्वांत कमी सीमा गोवा या राज्याला लागून आहे.
- महाराष्ट्राच्या वायव्येस दादरा-नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश लागून आहे.
* महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी ८०० कि.मी. ही मूळ संदर्भ ग्रंथातून तसेच दोन रेखावृत्तांमधील अंतराच्या आधारावर घेण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शेजारील राज्य व राज्यांना लागून असणारे जिल्हे व जिल्ह्यांना लागून असणारी राज्याची सीमा.
महाराष्ट्रातील एकूण २० जिल्ह्याची सीमा इतर राज्यांना लागून आहे.
महाराष्ट्रातील १६ जिल्ह्याची सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागून नाही.
राज्य व राज्यांना लागून असणारी जिल्ह्यांची संख्या -
मध्य प्रदेश ८,
कर्नाटक ७,
गुजरात ४,
तेलंगणा ४,
छतीसगड २.
गोवा १.
राजकीय सीमा:
गुजरात :- | पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार |
मध्य प्रदेश :- , | नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया |
छतीसगड :- | गोंदिया, गडचिरोली |
तेलंगणा :- | गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड |
कर्नाटक :- | नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग |
गोवा :- | सिंधुदुर्ग |
सलग दोन राज्यांना लागून असणारी जिल्ह्यांची सीमा :
१ | नंदुरबार - | गुजरात व मध्य प्रदेश |
२ | धुळे - | गुजरात व मध्य प्रदेश |
३ | गोंदिया - | मध्य प्रदेश व छत्तीसगढ़ |
४ | गडचिरोली - | छत्तीसगड व तेलंगणा |
५ | नांदेड - | तेलंगाना व कर्नाटक |
६ | सिंधुदुर्ग - | गोवा व कर्नाटक |
७ |
पालघर - |
दादर व नगर हवेली व गुजरात |
महाराष्ट्र जिल्हा निर्मिती
सध्या महाराष्ट्रात जिल्ह्यांची एकूण संख्या ३६ असून १ मे १९८१ पूर्वी महाराष्ट्रात जिल्ह्यांची एकण संख्या २६ होती. त्यानंतर महाराष्ट्रात नवान १० जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व आतापर्यंत महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या ३६ इतकी झाली आहे.
दिनांक | कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला | नवीन जिल्हा |
१ मे १९८१ | रत्नागिरी | सिंधुदुर्ग |
१६ ऑगस्ट १९८२ | उस्मानाबाद |
लातूर |
१ जुलै १९९८ | धुळे |
नंदुरबार |
१ मे १९९९ | भंडारा | गोंदिया |
४ ऑक्टोबर १९९० | मुंबई शहर | मुंबई उपनगर |
१ ऑगस्ट २०१४ | ठाणे | पालघर |
1 मे 1981 | औरंगाबाद | जालना |
26 ऑगस्ट 1982 | चंद्रपूर | गडचिरोली |
1 जुलै 1998 | अकोला | वाशीम |
1 मे 1999 | परभणी | हिंगोली |
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग :-
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी ४ प्रशासकीय विभाग होते.
सद्यस्थितीत महाराष्ट्राचे एकूण ६ प्रशासकीय विभाग सांगता येतील.
सर्वांत जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग - औरंगाबाद
सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग - कोकण
सर्वांत जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग - औरंगाबाद
सर्वांत कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग - कोकण
अ.क्र. | प्रशासकीय विभागाचे नाव | मुख्यालय | भौगोलिक विभागाचे नाव | जिल्ह्यांची संख्या | जिल्ह्यांची नावे |
---|---|---|---|---|---|
१. | कोकण | मुंबई | कोकण | ७ | पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
२. | पुणे | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | ५ | पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर |
३. | नाशिक | नाशिक | उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश | ५ | नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव |
४. | औरंगाबाद | औरंगाबाद | मराठवाडा | ८ | औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद |
५. | अमरावती | अमरावती | विदर्भ | ५ | अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम |
६. | नागपूर | नागपूर | विदर्भ | ६ | नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली |
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग :
महाराष्ट्राचे एकूण ५ प्रादेशिक विभाग सांगता येतील. ते पुढील नकाशाद्वारे -
विभाग व क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) | जिल्ह्याची संख्या | तालुक्यांची संख्या |
कोकण (मुंबई) 30,728 | 7, | 50, |
पश्चिम महाराष्ट्र (पुणे) 89, 853 |
7, | 87, |
खानदेश (जळगाव) 24,915 |
3, | 25, |
मराठवाड़ा (औरंगाबाद) 64,813 |
8, | 76, |
विदर्भ (नागपूर) 97,404 | 11 | 120 |
जिल्ह्यांचे मुख्यालय
जिल्हा | मुख्यालय |
रायगड | अलिबाग |
सिंधुदुर्ग | ओरोस बुद्रुक (सिंधुदुर्ग नागरी ) ता. कुडाळ |
मुंबई उपनगर | बांद्रा पूर्व ता. कुर्ला |
क्षेत्रफळाने प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम :- | औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण (मुंबई) |
क्षेत्रफळाने प्रादेशिक विभागाचा उतरता क्रम :- | विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, खानदेश |
क्षेत्रफळाने सर्वांत मोठे जिल्हे उतरत्या क्रमाने :- | अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली |
क्षेत्रफळाने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे :- | मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली |
No comments:
Post a Comment
If you have any doubt, let me know.