Tuesday, 12 May 2020

सर विन्स्टन चर्चिल

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

सर विन्स्टन चर्चिल


जन्म :- ३० नोव्हेंबर १८७४
मृत्यू :- २४ जानेवारी १९६५
ब्रिटनचा युद्धकाळातील पंतप्रधान, वृत्तपत्रकार, साहित्यिक व एक थोर राजकारणपटू.
पूर्ण नाव :-  विन्स्टन लेनर्ड स्पेन्सर चर्चिल

जन्मस्थान :- ब्रिटनच्या प्रसिद्ध मार्लबरो या उमराव घराण्यात त्यांचा ऑक्सफर्डशर येथे जन्म झाला
वडिलांचे नाव :- लॉर्ड रॅन्डॉल्फ
आईचे नाव :- जेनेट
शिक्षण :- हॅरो विद्यापीठ 
भारतात आगमन :- १८९५

हुजूर पक्षातर्फे १९०० मध्ये ते ब्रिटिश संसदेवर निवडून आले.

 चर्चिल यांना ब्रिटीश मंत्रिमंडळात प्रवेश मिळाला. एक दोन अपवाद सोडता १९०६ पासून १९५५ पर्यंत चर्चिल कोणत्या ना कोणत्या तरी खात्याचे मंत्री होते.

 बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष असताना (१९०८) आणि १९१० मध्ये गृहमंत्री ह्या पदावर असताना त्यांनी खाणीच्या कामगारांच्या सुरक्षिततेकरिता कायदा केला व बेकारांसाठी विम्याची योजना आखली. तत्पूर्वी १९०८ मध्ये त्यांनी क्लेमन्टाईन हेजिअर या युवतीशी लग्न केले.

नौदलाचे १९११ मध्ये मंत्रिपद मिळाल्यावर त्यांनी थोड्या काळातच नौदलाची पुनर्रचना केली. यामुळे पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस ब्रिटीशांचे नौदल सुसज्ज झाले होते. नौदलाला वायुदलाची जोड देण्याची कल्पना काढून त्यांनी जर्मन चढाई थोपवून धरली.



 दार्दानेल्सच्या सामुद्रधुनीतून तुर्कस्तानवर हल्ला करण्याची त्यांची योजना अयशस्वी झाली आणि गलिपलीच्या सुप्रसिद्ध लढाईत (१९१५) ब्रिटीश सैन्याचा मोठ्या प्रमाणात संहार झाला. ह्याचा दोष साहजिकच चर्चिलवर लादण्यात आला. त्यामुळे लढाईसाठी सर्व पक्षीय संमिश्र सरकार स्थापन झाल्यावर हुजूर पक्षीय पुढाऱ्यांनी चर्चिलना आरमार खात्यातून काढून टाकण्याची मागणी केली. पंतप्रधान ॲस्क्विथने ती मान्य करून चर्चिल यांच्याकडे दुसरे गौण खाते दिले. या अपमानामुळे त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा सैन्यात प्रवेश केला. तथापि १९१६ मध्ये त्यांचे मित्र लॉइड जॉर्ज हे मुख्य प्रधान झाले. त्यांनी जुलै १९१७ मध्ये चर्चिल यांची युद्धमंत्री म्हणून नेमणूक केली. या पदावर असताना त्यांनी निवृत्त झालेल्या सैनिकांची योग्य ती व्यवस्था लावून दिली. या वेळी रशियन क्रांतीस त्यांनी कडवा विरोध करून डाव्या लोकांचे शत्रुत्व पत्करले.

ऑक्टोबर १९२२ मध्ये हुजूर पक्षाने लॉइड जॉर्ज यांच्या संयुक्त मंत्रिमंडळाचा पाठिंबा काढून घेतला आणि ते मंत्रिमंडळ बरखास्त झाले. नवीन निवडणुकीमध्ये चर्चिल यांना पराभव पत्कारावा लागला. उदारमतवादी पक्षाने मजूर पक्षास पाठिंबा देऊन त्यांचे सरकार सत्तेवर आणल्याबद्दल त्यांस अत्यंत राग आला, ही गोष्ट त्यांस सहन झाली नाही. ते मजूर पक्षाचे कडवे विरोधक होते. म्हणून उदारमतवादी पक्ष सोडून त्यांनी पुन्हा हुजूर पक्षात पदार्पण केले. १९२४ च्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते संसदेवर निवडून आले आणि त्यांना अर्थमंत्रिपद प्राप्त झाले. मात्र १९२९ च्या उदारमतवादी पक्षाच्या विजयानंतर जवळजवळ १० वर्षे चर्चिल यांना राजकीय वनवासात काढावी लागली.

 ते म्हणत, मी काही ब्रिटिश साम्राज्याचे दिवाळे काढण्यासाठी इथे बसलो नाही. म्हणून १९३५ च्या हुजूर पक्षाच्या मंत्रिमंडळातही त्यांना घेण्यात आले नाही. ह्या वेळी हिटलरच्या वाढत्या सत्तेला पायबंद घालणे आवश्यक आहे, असे ते प्रतिपादित. एवढेच नव्हे, तर हिटलर जगावर सर्वंकष युद्ध लादणार असे युद्धाच्या अगोदर ३-४ वर्षे चर्चिल यांनी भाकित केले होते, पण त्याकडे कुणी फारसे लक्ष दिले नाही. या काळात त्यांनी आणखी एक पुस्तक मार्लबरो : हिज लाइफ अँड टाइम्स (४ खंड, १९३३–३८) लिहिले. वरील दोन ग्रंथांमुळे त्यांस भरपूर आर्थिक लाभ झाला आणि साहित्यिक क्षेत्रात त्यांचा नावलौकिक वाढला.

दुसरे जागतिक युद्ध १९३९ मध्ये सुरू झाले. चर्चिल यांना प्रथम आरमार खात्याचा मंत्री म्हणून बोलविण्यात आले आणि वर्षाच्या आतच १९४० मध्ये त्यांची नेमणूक संमिश्र सरकारात पंतप्रधान म्हणून झाली. ही वेळ ब्रिटिश साम्राज्याची काळवेळ होती. हिटलरचे विजयी सैन्य चौफेर चढाई करीत होते व पोलंड, हॉलंड, बेल्जियम, नॉर्वे, फ्रान्स अशा देशांनी एका पाठोपाठ एक शरणागती पतकरली होती. जर्मनीच्या अमानुष विस्ताराला आळा घालून लोकशाहीचे संरक्षण करणे, हा तत्कालीन लोकशाहीवादी राष्ट्रांचा मुख्य उद्देश होता. आपल्या पहिल्या भाषणातच त्यांनी रक्त, अश्रू, श्रम व घाम यांखेरीज माझ्याजवळ देण्यासारखे काहीही नाही, असे तडफदारपणे सांगून ब्रिटिशांची विजिगीषू वृत्ती उत्तेजित केली. ह्याच झुंजार वृत्तीने इंग्लडने त्यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली अमेरिका युद्धात पडेपर्यंत एकट्याने लढत दिली. पुढे त्यांनी अमेरिकेची मैत्री संपादन केली. एवढेच नव्हे, तर साम्यवादाबद्दल अंतरी द्वेष असतानाही त्यांनी स्टालिनशी हातमिळवणी करून रशियाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका या तीन बड्या राष्ट्रांत (थ्री बिग्ज) रशियास घेऊन जर्मनी विरुद्ध फळी उघडली. डंकर्क येथील पराभवाने न डगमगता जपान व जर्मनीचा जमेल तिथे पराभव करून ब्रिटनचे नैतिक धैर्य त्यांनी कधीही खचू दिले नाही.



No comments:

Post a Comment

If you have any doubt, let me know.