ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.
अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.
वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.
मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
उदा .
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
उदा .
हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरनातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.
उदा.
ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.
उदा .
जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
उदा .
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.
उदा.
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात
उदा .
भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा .
मराठी व्याकरण प्रयोग व त्याचे प्रकार
वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.
मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- भावे प्रयोग
1. कर्तरी प्रयोग (Active Voice) :
जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.उदा .
- तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी)
- ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)
- ते चित्र काढतात. (कर्ता- वचन)
- 1. सकर्मक कर्तरी प्रयोग
- 2. अकर्मक कर्तरी प्रयोग
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
- राम आंबा खातो.
- सीता आंबा खाते. (लिंग)
- ते आंबा खातात. (वचन)
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
- राम पडला
- सिता पडली (लिंग)
- ते पडले (वचन)
2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) :
क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.उदा .
- राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)
- राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)
- राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)
- 1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
- 2. नवीन कर्मणी प्रयोग
- 3. समापन कर्मणी प्रयोग
- 4. शक्य कर्मणी प्रयोग
- 5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग
हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरनातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.
उदा.
- नळे इंद्रास असे बोलीले.
- जो – जो किजो परमार्थ लाहो.
ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.
उदा .
- रावण रामाकडून मारला गेला.
- चोर पोलिसांकडून पकडला गेला.
जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
- त्याचा पेरु खाऊन झाला.
- रामाची गोष्ट सांगून झाली.
जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
- आई कडून काम करविते.
- बाबांकडून जिना चढवितो.
कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
- त्याने काम केले.
- तिने पत्र लिहिले.
3. भावे प्रयोग :
जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.उदा .
- सुरेशने बैलाला पकडले.
- सिमाने मुलांना मारले.
- 1. सकर्मक भावे प्रयोग
- 2. अकर्मक भावे प्रयोग
- 3. अकर्तुक भावे प्रयोग
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.
उदा.
- शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.
- रामाने रावणास मारले.
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात
उदा .
- मुलांनी खेळावे.
- विद्यार्थांनी जावे.
भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा .
- आता उजाडले.
- शांत बसावे.
- आज सारखे उकडते.
No comments:
Post a Comment
If you have any doubt, let me know.