ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.
अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.
प्रसिद्ध मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
| अगं अगं म्हशी मला कोठे नेशी | स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. |
| आपला हात जगन्नाथ | आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. |
| अति तेथे माती | कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. |
| आयत्या बिळात नागोबा | दुसर्याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. |
| आईजीच्या जीवावर बाईजी उदार | दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. |
| आपल्याच पोळीवर तूप ओढणे | फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे. |
| आंधळे दळते कुत्रं पीठ खाते | एकानं काम करावं आणि दुसर्यांनं त्याचा फायदा घ्यावा. |
| आधी पोटोबा मग विठ्ठोबा | आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. |
| अडला हरी गाढवाचे पाय धरी | एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. |
| आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे | अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. |
| अति शहाणा त्याचा बैल रिकामा | जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही. |
| आधी शिदोरी मग जेजूरी | आधी भोजन मग देवपूजा |
| असतील शिते तर जमतील भुते | एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. |
| आचार भ्रष्टी सदा कष्टी | ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो. |
| आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली | अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. |
| आईचा काळ बायकोचा मवाळ | आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा |
| आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास | मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. |
| आपलेच दात आपलेच ओठ | आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे. |
| अंथरूण पाहून पाय पसरावे | आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. |
| आवळा देऊन कोहळा काढणे | क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. |
| आलीया भोगाशी असावे सादर | कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. |
| अचाट खाणे मसणात जाणे | खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो. |
| आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते | अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. |
| आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला | ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे. |
| आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं | स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. |
| अळी मिळी गुप चिळी | रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे. |
| अहो रूपम अहो ध्वनी | एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे. |
| इच्छा तेथे मार्ग | एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच. |
| इकडे आड तिकडे विहीर | दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे. |
| उठता लाथ बसता बुकी | प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. |
| उडत्या पाखरची पिसे मोजणे | अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे. |
| उधारीचे पोते सव्वाहात रिते | उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो. |
| उंदराला मांजर साक्ष | वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे. |
| उचलली जीभ लावली टाळ्याला | विचार न करता बोलणे. |
| उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग | प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे. |
| उथळ पाण्याला खळखळाट फार | थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो. |
| उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये | कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. |
| एक ना घड भारभर चिंध्या | एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था. |
| एका माळेचे मणी | सगळीच माणसे सारख्या स्वभावाची. |
| एका हाताने टाळी वाजत नाही | दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे. |
| ऐकावे जनाचे करावे मनाचे | लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. |
| एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत | दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत. |
| ओळखीचा चोर जीवे न सोडी | ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो. |
| कर नाही त्याला डर कशाला | ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे |
| कामापुरता मामा ताकापुरती आजी | आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे. |
| काळ आला होता. पण वेळ आली नव्हती | नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. |
| कानामगून आली आणि तिखट झाली | मागून येऊन वरचढ होणे. |
| करावे तसे भरावे | जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते. |
| कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी | कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे. |
| कुर्हाडीचा दांडा गोतास काळ | आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो. |
| काठी मारल्याने पानी दुभंगत नाही – | रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही. |
| कडू कारले तुपात तळले सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूच | किती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव (दूर्वर्तणी) बदलत नाही. |
| कुडी तशी पुडी | देहाप्रमाणे आहार असतो. |
| कधी तुपाशी तर कधी उपाशी | संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते. |
| कावळा बसायला अन फांदी तुटायला | परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे. |
| कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच | कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही. |
| कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे | रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे. |
| कोल्हा काकडीला राजी | क्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात. |
| कोरड्याबरोबर ओले ही जळते | निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे |
| कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही | निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. |
| काखेत कळसा नि गावाला वळसा | हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे. |
| कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही | क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते. |
| खाण तशी माती | आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे. |
| खर्याला मरण नाही | खरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते! |
| खाऊ जाणे ते पचवू जाणे | एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. |
| खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी | परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा. |
| खाऊन माजवे टाकून माजू नये | पैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये. |
| खोट्याच्या कपाळी गोटा | वाईट कृत्य करणार्याला माणसाचे शेवटी वाईटच होते. |
| गरजवंताला अक्कल नसते | गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते. |
| गर्वाचे घर खाली | गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच. |
| गरज सरो नि वैध मरो | आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे. |
| गर्जेल तो पडेल काय | केवळ गाजावाजा करणार्या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते. |
| गाढवाला गुळाची चव काय? | मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. |
| गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ | मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार |
| गाव करी ते राव ना करी | श्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात. |
| गाड्याबरोबर नळ्याची यात्रा | मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो. |
| गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता | मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो. |
| गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली | एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे. |
| गाढवाच्या पाठीवर गोणी | एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा. |
| गुरुची विद्या गुरूला फळली | एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. |
| गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य | ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे. |
| गोगलगाय नि पोटात पाय | एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. |
| गोरागोमटा कपाळ करंटा | दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती. |
| घर ना दार देवळी बिर्हाड | बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती. |
| घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात | एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात. |
| घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे | स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्यांने आपलेही काम लादणे. |
| घर पहावे बांधून लग्न पहावे करून | अनुभवाने माणूस शहाणा होतो. |
| घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते | आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात. |
| घरोघरी मातीच्याच चुली | सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे. |
| घोडे खाई भाडे | धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त. |
| चढेल तो पडेल | गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही. |
| चालत्या गाडीला खीळ | व्यवस्थीत चालणार्या कार्यात अडचण निर्माण होणे. |
| चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही | लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत. |
| चिंती परा येई घरा | दुसर्याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते. |
| चोर सोडून सान्याशाला फाशी | खर्या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्याच निरपराध माणसाला शिक्षा देणे. |
| चोराच्या उलटया बोंबा | स्वत:च गुन्हा करून दुसर्यावर आळ घेणे. |
| चोराच्या मनात चांदणे | वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. |
| चोरावर मोर | एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्यावर कडी करणे. |
| जळत्या घराचा पोळता वासा | प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे. |
| जलात राहुन माशांशी वैर करू नये | ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये. |
| जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला | निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते. |
| जळत घर भाड्याने कोण घेणार | नुकसान करणार्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार. |
| जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे | दुसर्याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते. |
| ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी | एकमेंकाचे वर्म माहीत असणार्या माणसांशी गाठ पडणे. |
| ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट | जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत. |
| जशी देणावळ तशी धुणावळ | मिळणार्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. |
| ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे | एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो. |
| जी खोड बाळ ती जन्मकळा | लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात. |
| ज्याच्या हाती ससा तो पारधी | ज्याला यश मिळाले तो कर्तबगार |
| जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही | मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही. |
| जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी | मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते. |
| झाकली मूठ सव्वा लाखाची | व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते. |
| टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही | कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. |
| टिटवी देखील समुद्र आटविते | सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो. |
| डोळ्यात केर आणि कानात फुंकर | रोग एक आणि उपचार दुसराच |
| डोंगर पोखरून उंदीर काढणे | प्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे. |
| तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला | भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे. |
| तळे राखील तो पाणी चाखील | आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते. |
| ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला | वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो. |
| ताकापुरते रामायण | आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे |
| तोंड दाबून बुक्यांचा मार | एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे. |
| तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले | फायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. |
No comments:
Post a Comment
If you have any doubt, let me know.